जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
          पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा 

अन्यायाचा धुर तुम्ही ,पसरविला चोहीकडे 
भेदफोडीचा मंत्र वापरून , मोडले एकीचे कंबरडे 
पापांची या तुमच्यामोजून देऊ सजा    
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

हाताशी धरून काही जणांना , पसरविला तुम्ही दहशदवाद 
ललकारले आमच्या अस्मितेला ,झोपलेल्या सिंहला घातली साद 
कमी राहले दिवस तुमचे ,आता शेवटचे क्षण मोजा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

जालियनवाल्या बागेची मातीअजुनही लाल आहे
तुम्ही केलेल्या अत्याचाराची जखम अजुनही खोल आहे 
प्रायश्चित करा तुम्ही पापांची , क्षमा आता मगा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

जे  भेकाड्यांचे रक्त असते , ते पाठीमागून वार करते
मर्द मराठे हिम्मतीने , छातीवरती वार झेलते 
शिवबांचे वारस आता , दाखवतील तुम्हाला जागा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

एका  गालावर मार खाल्यावर , दुसरा  पुढे करायची आता वेळ नाही 
बापू तुम्ही माफ करा  ,अहिंसा एवढी दुबळी नाही  
प्रेमाची भाषा त्यांना आता , समजत नाही बघा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

नामर्दाची फौज उभी सारी , मर्दुमकीचे नगारे आहे
उंदराच्या तालावर आता , वाघोबा नाचत आहे 
वाघाशी आता घाठ तुमची ,जरा अंतर ठेऊन वागा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

काय करावे  काय नये आता ,याचा जास्त विचार करू नका 
विंचवाची नांगी ठेचल्याशिवाय , स्वस्थ आता बसू नका 
अस्तनीतल्या सापाची आता , राखू नका निगा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून , ऐक्याचा आवाज गुंजत आहे 
मर्द मराठ्यांची कामगिरी , स्वर्गातून बघत आहे 
मर्द मराठे जागे झाले आता , मर्यादेने वागा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

एकतर्फी शांतीचा नारा , लावण्यात आता अर्थ नाही
आमच्या चांगल्या वागण्यानेही , तुमच्या डोक्यात फरक पडत नाही 
'लातोंके भुत बातोंसे नाही मानते ' , या शब्दात त्यांना सांगा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

संतांची शिकवण आम्ही पाळतो , म्हणून तुमची गय करतो 
अहिंसा काही दुबळी नाही , त्यांना तुम्हाला प्रचिती देतो 
धर्माची तुम्ही शिकवण आठवा , आता माणुसकीने वागा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

शब्दांची भाषा संपली आता , तुम्हाला शस्त्रांचे पाणी पाजू 
पुष्कळ झाले तुमचे आता , जास्त नका माजू 
विश्वाश ठेवला वेळोवेळी , तरी तुम्ही दिला दगा          
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

मदत तुम्हाला किती केली , तरीही तुमचे पोट भरत नाही 
कर्ज देणारा पैदल झाला , कर्ज घेणे तुमचे थांबत नाही 
ताळेबंदातल्या कर्जात , भारतीयांचा हिस्सा बघा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

फुटीरवाद्यांचा धर्म नसतो , नसते त्यांची जात 
फुसक्या गोळा बारुदीला , आता ते लवु पाहतात वात 
तुमचेही तुम्हाला देत नाही , दफनासाठी जागा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा

लाखो झाले करोडो होतील , शिवाबा सारखा होणार नाही 
आश्वासन तुला मी शिवबा देतो , हा मर्द मराठा कधी झुकणार नाही 
बिळात लपून काय बसता , जरा बिलातून बाहेर निघा 
जिजाऊचे  शिक्षण आम्हालादेणार नाही दगा 
पाठीमागून वार करणाऱ्यनोएकदा समोर येऊन बघा  

तन्मय विजय बंगाले 
बी.ई (प्रथम वर्ष )
एम.आई.टी ,
पुणे  
९४२२८६२०८३

Comments